अरविंद केजरीवालांवर चप्पल फेकण्याचा एका अज्ञात व्यक्तीने केलेला प्रयत्न अपयशी Print

alt

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०१२
इंडीया अगेन्स्ट करप्शन(आय.ए.सी) च्या बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने अरविंद केजरीवालांवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषद सुरू असताना एक व्यक्तीने अचानक उभे राहून नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर केजरीवाल उत्तर का देत नाहीत? तसेच दिल्लीत गेल्या वीस वर्षात आय.आर.एस अधिकारी असताना केजरीवालांनी आरोप का केले नाहीत? असे प्रश्न केजरीवालांना विचारले. हेच प्रश्न याआधी काँग्रेसचे सचिव दिग्विजय सिंग यांनीही उपस्थित केले होते.
केजरीवाल समर्थकांनी सदर व्यक्तीची अडवणूक केली असता केजरीवालांनी त्याव्यक्तीला बोलू देण्याचे आपल्या समर्थकांना सांगीतले,  दरम्यान तीन तरूणांनी अरविंद केजरीवालां विरूद्ध घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यातील एका तरूणाने चप्पल काढून केजरीवालांवर फेकण्याचा प्रयत्न करत असताना केजरीवाल समर्थकांनी त्याव्यक्तीस वेळीचं ताब्यात घेतले.  या तीन तरूणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यातील एकाचे नाव जगदीश शर्मा असल्याचे समजते.
 इंडीया अगेन्स्ट करप्शन(आय.ए.सी)बरोबर या घटना घडणारचं ही अपेक्षा होतीचं असे स्पष्ट करत केजरीवालांनी घडलेल्या प्रसंगाचा राजकीय दृष्टीकोनातून उत्तर दिले. " आम्ही राँबर्ट वडेरा, सलमान कुर्शीद आणि नितीन गडकरी यांच्यासारख्या बड्या व्यक्तींच्या विरोधात आवाज उठवला असताना अशा घटना घडणारचं होत्या."असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.