मोदी विवाहीत असल्याचा दिग्विजय सिंग यांचा दावा Print

alt

नवी दिल्ली, १ नोव्हेंबर २०१२
शशी थरूर यांच्या प्रेयसीबाबत टिप्पण्या करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैवाहिक जीवनाची माहिती उघड करावी, असे आव्हान कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिले. यू टय़ूब या संकेतस्थळावर ‘नरेंद्र मोदी यांची पत्नी’ असा मजकूर टाकल्यास ‘यशोदा बेन’ ही त्यांची पत्नी असल्याची बाब पुढे येते असा जावईशोध सिंग यांनी लावला आहे. इतरांबाबत बोलणारे मोदी स्वतच्या पत्नीबाबत मौन का बाळगून असतात, असा सवाल करीत मोदी यांनी सुनंदा पुष्कर यांच्याबाबत केलेले विधान हा भारतातील सर्व स्त्रीयांचा अवमान असल्याचेही दिग्विजय सिंगांनी म्हटले आहे.