सागरी चाच्यांबाबत सावधगिरीचा इशारा Print

पीटीआय, वॉशिंग्टन
सोमाली सागरी चाच्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या कारवाया आता भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत विस्तारल्याची भीती व्यक्त करीत अमेरिकेने भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. या चाच्यांच्या कारवायांबाबत अन्य देशांबरोबर नेहमी चर्चा करणे आणि उपाय योजणे हे अमेरिकेचे राजनैतिक धोरण असल्याचे मत वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. या सागरी डाकूंच्या कारवाया रोखण्यासाठी जगभरातील अनेक राष्ट्रे प्रयत्नशील आहेत.