खेमकांना धमक्या Print

पी.टी.आय., चंदीगढ
रॉबर्ट वढेरा यांच्या वादग्रस्त जमिनव्यवहाराच्या चौकशीने झोतात आलेले हरयाणाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांना पुन्हा एकदा धमकीचा दूरध्वनी आला आहे. पंचकुला पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
‘हरयाणा बीज विकास कॉर्पोरेशन’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असून एका अज्ञात इसमाने खेमका यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर कॉल करून त्यांना धमकी दिली. खेमका त्यावेळी कार्यालयात नसल्यामुळे एका महिला कर्मचाऱ्याने हा दूरध्वनी घेतला होता. या इसमाने अत्यंत असभ्य भाषा वापरून खेमका यांना धमकी दिली.