कामतांविरोधातील अहवाल स्वीकारला Print

वृत्तसंस्था, पणजी
गोव्यातील बेकायदा खाणकामावरून माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरणारा लोकलेखा समितीचा अहवाल विधानसभाध्यक्षांनी स्वीकारला आहे. तत्कालीन विधानसभाध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी हा अहवाल रोखला होता.
विरोधीपक्षनेते असलेले भाजपचे मनोहर पर्रिकर हे या समितीचे तेव्हाचे अध्यक्ष होते. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांनी मात्र या अहवालच्या विश्वासार्हतेबद्दल शंका व्यक्त करीत तो अहवाल रोखला होता. आता हा अहवाल सरकारकडे देण्यात आला असून कारवाईचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे, असे विधानसभाध्यक्ष राजेंद्र आर्लेकर म्हणाले.