चीनच्या ‘रडारचुकव्या’ विमानाची चाचणी Print

पीटीआय, बीजिंग
चीनने नुकतेच रडारच्या आवाक्यात येऊ न शकणाऱ्या जे- ३१ या अद्ययावत लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी घेतली़  अमेरिकी तंत्रज्ञानाशी बरोबरी करण्याच्या शर्यतीत ही विमाने म्हणजे एक मैलाचा दगड ठरणार आहेत़  लिओनियन प्रभागातील शेन्यांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन येथे या विमानांची ११ मिनिटांची पहिलीवहिली चाचणी घेण्यात आली, असे वृत्त ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्राने दिली आह़े  या विमानात सध्या रशियन इंजिन आह़े  मात्र लवकरच त्यात डब्ल्यूएस-१३ हे मूळ इंजिन बसवण्यात येणार असल्याचे येथील विमानशास्त्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आह़े