ओबामांकडून हवाई पाहणी Print

पीटीआय, न्यूजर्सी
सॅण्डीचा सर्वाधिक फटका बसलेल्या न्यूजर्सी राज्याच्या किनारपट्टी भागाची अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यांच्याबरोबर न्यूजर्सीचे रिपब्लिकन गव्हर्नर आणि त्यांचे कट्टर विरोधक ख्रिस ख्रिस्ती हे होते. संकटसमयी या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आपदग्रस्त भागाच्या पुनर्उभारणीसाठी एकदिलाने काम करण्याचा दृढनिश्चय केला. अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असताना अशी एकजूट दाखवणारी ही अनोखी घटना मानली जात आहे.