सॅण्डीचे ७० बळी Print

पीटीआय, न्यूयॉर्क

सॅण्डी वादळाने अमेरिकेत हाहाकार उडाला असून गेल्या चार दिवसांत विविध भागांत ७० नागरिकांचे बळी गेले आहेत. या वादळाच्या तडाख्याने बहुतेक शहरांमधील वीजपुरवठा तसेच दळणवळण यंत्रणा ठप्प पडल्या असून तब्बल ४० लाख नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सॅण्डीमुळे समुद्राला उधाण आले असून न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीसह आजूबाजूच्या भागांतही मोठय़ा प्रमाणात पाणी भरले आहे.  ढिगाऱ्याखालून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.सुमारे ४० लाख नागरिक तीन दिवसांपासून वीजपुरवठय़ापासून वंचित आहेत. न्यूयॉर्कचे गव्हर्नर क्युओमो यांनी या नैसर्गिक आपत्तीत तब्बल ६ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याची माहिती दिली.
शेअर बाजार सुरू
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या कामकाजाला गुरुवारी सुरुवात झाली.
लूटमारीचे प्रकार
वादळाने जनजीवन कमालीचे विस्कळीत असून त्याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या.