विनाअनुदित सिलिंडर महागला अन् स्वस्तही झाला! Print

पीटीआय, नवी दिल्ली
स्वस्तात मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या संख्येवर वर्षांला केवळ सहा सिलिंडर अशी मर्यादा आणल्यानंतर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २६ रुपये ५० पैशांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी घेतला आणि त्याच दिवशी रात्री तो गोठविलाही.
केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यातच सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात कपात करून स्वस्तातल्या सिलिंडरची संख्या वर्षांला सहा अशी मर्यादित केली होती. तसेच यापेक्षा जास्त सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे पैसे मोजावे लागतील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयावरून गेले महिनाभर आरडाओरड होत असतानाच तेलकंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून हे सिलिंडर खरेदी करणाऱ्यांना २६.५० रु. जास्त मोजावे लागणार होते. त्यामुळे मुंबईत आधी ९०६ रुपयांना मिळणारा १४.२ किलोचा घरगुती वापरासाठीचा सिलिंडर ९३३.५० रुपयांवर गेला होता. परंतु रात्री उशीरा ही दरवाढ लागू न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.