तेलवाहू जहाजातील बेपत्ता खलाशांचा शोध जारी Print

पी.टी.आय., चेन्नई
‘प्रतिभा कावेरी’ या तेलवाहू जहाजावरील सहा खलाशी बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर तेलवाहू जहाज येथील किनाऱ्यावरून भरकटले होते. या जहाजावरील अन्य १५ खलाशांना वाचविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेपत्ता खलाशांचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाची ‘वरुणा’ आणि ‘राजश्री’ ही जहाजे तैनात करण्यात आली असून दोन हेलिकॉप्टरही या कामाला लागली आहेत. येथून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या महाबळीपुरम् येथे नीलम चक्रीवादळाने तडाखा दिल्यानंतर जहाज भरकटले. या गडबडीत एक खलाशी बुडाला तर उर्वरित १५ खलाशांना स्थानिक मच्छीमारांनी वाचविले.