माहितीचा अधिकार कायद्यात राजकीय पक्षांचा समावेश नको Print

alt

राजकीय पक्षांची मागणी
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०१२
भाजप, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहूजन समाजवादी पक्ष या सर्व राजकीय पक्षांनी केंद्र माहिती आयोगाकडे (सी.आय.सी) माहिती अधिकार कायद्यात राजकीय पक्षांचा समावेश करू नये अशी मागणी केली आहे. मात्र, यावर काँग्रेस पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. माहिती अधिकाराच्या कायद्यात राजकीय पक्षांच्या समावेशाच्या विरोधी भूमिका असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला सर्व माहिती निवडणूक आयोग आणि आयकर विभागासमोर सादर करावीच लागते, त्यामुळे माहिती अधिकाराच्या कक्षेत राजकीय पक्षांना समाविष्ट करणे गरजेचे नाही असे या पक्षांनी म्हटले आहे. माहिती आयोगाचे मुख्य सत्यानंद मिश्रा तसेच मुख्याधिकारी एम.एल.शर्मा आणि अनुपमा दीक्षित यांनी हा निर्णय गुरूवारी प्रलंबित ठेवला.
आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल आणि अनिल बैरवाल यांनी माहिती अधिकाराखाली राजकीय पक्षांकडून माहिती मागितल्यास, आम्ही सार्वजनिक विभाग नसून,  माहिती अधिकाराअंतर्गत आमचा समावेश केलेला नाही अशी प्रतिक्रिया राजकीय पक्षांकडून देण्यात येत आहे.