प्रसारमाध्यमे- केजरीवाल यांच्यावर प्रेमजी बरसले Print

बंगळुरू
प्रसारमाध्यमे आणि अरविंद केजरीवाल हे कोणत्याही विषयाबाबत गंभीर नाहीत. त्यांना वेगवेगळे विषय उकरून काढण्यातच अधिक रस आहे, अशी टीका विप्रो कंपनीचे संचालक अझीम प्रेमजी यांनी शुक्रवारी केली. प्रसारमाध्यमांशी विविध विषयांचा गौप्यस्फोट करण्यापेक्षा एखादा विषय सातत्याने लावून धरावा, अशी विनंती त्यांनी या वेळी केली. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. मागील दोन वर्षांत देशातील परिस्थिती फारशी बिघडलेली नाही. गांधी कुटुंब, रॉबर्ट वढेरा तसेच सलमान खुर्शिद यांच्यावरील आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.