स्वतंत्र तेलंगणा निर्मितीबाबत चर्चा सुरू - सुशीलकुमार शिंदे Print

पीटीआय
हैदराबाद
तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलण्याची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
याबाबत आंध्र प्रदेशातील खासदारांनी आपली भेट घेतली आहे. आपणही त्यांच्याशी चर्चा करीत आहोत. या प्रश्नावर काळजीपूर्वक पावले उचलली पाहिजेत, कारण त्याचे आंध्र प्रदेशातच नव्हे तर अन्य राज्यांमध्येही पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे सर्वमान्य तोडगा कसा निघेल ते पाहावयास हवे, असेही शिंदे म्हणाले.