लष्करी अधिकारी-सैनिक यांच्यात बेबनाव Print

पीटीआय
नवी दिल्ली
  लष्करातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील बेबनाव दिवसेंदिवस वाढत चालल्याची प्रकरणे समोर येत आहेत. ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली हलकी कामे करण्यास दहा जवानांनी स्पष्ट नकार दिल्याचा प्रकार पतियाळा येथे घडला असून अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ हे जवान आपापल्या मूळ केंद्रावर परतले आहेत. पतियाळातील अधिकाऱ्यांनी हलकी कामे सांगितल्याने संतप्त झालेल्या ५६ आर्मर्ड रेजिमेण्टच्या जवानांनी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे आपल्या मूळ केंद्राकडे परतण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची लष्करानेही गंभीर दखल घेतली असून या जवानांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची आणि कोर्ट ऑफ इन्क्वायरी बसविण्याचे प्रस्तावित केले जात आहे.