गडकरींबाबत संघ ‘दक्ष’ नाही! Print

पीटीआय
चेन्नई
आपल्या कंपनीतील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाध्यक्षपदाची सूत्रे देण्याबाबतचा निर्णय पक्षानेच घ्यावा, असे रविवारी स्पष्ट करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या निर्णयाबाबतची जबाबदारी भाजपवरच ढकलली. त्याचबरोबर ‘स्वयंसेवक’ गडकरींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची संघ स्वतंत्ररित्या चौकशी करणार नाही, असे सांगून संघाचे महासचिव सुरेश जोशी यांनी संघ याबाबतीत ‘दक्ष’ नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक केलांमबक्कम येथे पार पडली. त्या वेळी जोशी पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत गडकरींच्या अध्यक्षपदाच्या मुद्दय़ावर कोणतीही चर्चा झाली नाहीे, असे त्यांनी सांगितले.