हिमाचल प्रदेशात दणक्यात मतदान Print

वृत्तसंस्था
सिमला
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी ७४.६२ टक्के इतके दणदणीत मतदान झाले. सत्तारूढ भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना असून दोन्ही पक्षांचे केंद्रीय नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विळख्यात असल्याने लोक कोणाच्या बाजूने मते देतात, याबाबत राजकीय पक्षांतही कुतूहल आहे.
मतदानाची मुदत संपली तरी २०० मतदानकेंद्रांवरील रांगा कायम असल्याने मतदानाच्या प्रमाणात वाढ होणार आहे, असे निवडणूक आयोगाचे महासंचालक अक्षय राऊत यांनी वार्ताहरांना सांगितले. २००३ साली ७४.५१ टक्के मतदान झाले होते. यंदाचे मतदान त्यापेक्षा पुढे जाणार आहे.  
गुजरात निवडणुकीनंतर म्हणजे २० डिसेंबरला हिमाचल प्रदेशची मतमोजणी होणार आहे. तोवर इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे ही निमलष्करी दलाच्या बंदोबस्तात ठेवली जातील तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही त्यांच्यावर नजर राहील.