भारताला दरवर्षी केली जाणारी २८० लाख पाऊंडची मदत २०१५ पासून ब्रिटीश सरकार कमी करणार Print

alt

लंडन, ५ नोव्हेंबर २०१२
२०१५ पासून भारताला प्रतिवर्षी केल्या जाणा-या मदतीत २८० लाख पाऊंडची घट करण्याचा निर्णय ब्रिटीश सरकारने केला आहे. हा निधी देशातील सार्वजनिक सेवांवर खर्च करण्यापेक्षा विदेशी मदतकार्यांसाठी खर्च करण्याचा ब्रिटीश सरकारचा मनसुबा आहे.
डेली मेल यांच्यानुसार, एड टू इंडिया ह्या योजना आंतराष्ट्रीय विकास सचिव जस्टीन ग्रेनिंग यांच्या मार्फत २०१५ पूर्वी तपासल्या जाणार आहेत.
ग्रेनिंग यांच्या या आठवड्यातील भारत दौ-यादरम्यान भारतीय नेत्यांशी सदर योजनेच्या जागी 'व्यापारी मदत' योजना सुरू करण्यासाठीची चर्चा करणार आहेत. गेल्यावर्षी आंतराष्ट्रीय विकास खात्याने जाहीर केलेल्या माहितीनुसार रशिया, चीन आणि भारताला केल्या जाणा-या मदतीत घट करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे या देशांव्यतिरिक्त ही मदत केनिया आणि सोमालिया सारख्या गरीब देशांना केली जावी असेही स्पष्ट केले होते.