प्रिती जैन बलात्कार प्रकरण : नऊ वर्षांनंतर मधुर भांडारकरला दिलासा Print

alt

नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर २०१२
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यावर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप सर्वोच्च न्यायालयाने आज(सोमवार) खोडून काढले आहेत. सदर आरोपांची चौकशी योग्यरितीने होत नसून, फक्त आरोपकर्तीच्या मताच्या आधारावर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याबाबत मधुर भांडारकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
चित्रपटात मुख्य भूमिका देण्याचे आश्वासन देऊन बलात्कार करण्यात आल्याचा आरोप अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या प्रिती जैन यांनी केला होता. गेल्या नऊ वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू असून आता हे प्रकरण पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे प्रिती जैन यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते.
प्रिती जैन यांनी जुलै २००४ साली वर्सोवा पोलीस ठाण्यात मधुर भांडारकर यांच्या विरोधात १९९९ ते २००४ दरम्यान तब्बल १६ वेळा बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली होती. तसेच भांडारकर यांनी लग्नाचे आणि चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले होते आणि नंतर या वक्तव्यावर ते मागे फिरले असल्याचंही प्रिती जैन यांनी स्पष्ट केले होते.
सप्टेंबर २०११ साली पोलिसांनी भांडारकरांविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते.