फेसबुक देणार वाय-फाय सेवा Print

alt

वॉशिंग्टन, ५ नोव्हेंबर/पीटीआय
फेसबुक वापरकर्त्यांसाठी दिवाळी भेट. आता तुम्हाला कॉफी शॉपमध्ये बसल्या बसल्या वाय-फाय पासवर्ड कुणाला विचारायची गरज नाही कारण फेसबुक सध्या नवीन वाय-फाय सेवेची चाचणी घेत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर जर कुणाला फेसबुक चेक इन करायचे असेल तर त्याला इंटरनेट अ‍ॅक्सेस फुकट असणार आहे.
छोटे उद्योजक त्यांच्या ग्राहकांना फेसबुक रूटरच्या माध्यमातून थेट इंटरनेट अ‍ॅक्सेस देऊ शकतील, त्यामुळे चेक इन करताच त्यांना फेसबुक पेजवर जाता येईल असे ‘डिस्कव्हरी न्यूज’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सध्या फेसबुक या मोफत वाय-फाय सेवेची चाचणी स्थानिक उद्योगांच्या ठिकाणी घेत असून त्यामुळे फेसबुकवर चेक इन केल्यानंतर पटकन अ‍ॅक्सेस मिळणे सोपे जाणार आहे. जर तुमचा छोटा उद्योग असेल आणि त्याचे फेसबुक पेज तुम्ही तयार केले असेल, तर तुम्हाला यापुढे वाय-फाय सेवेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही फेसबुक चेक इन केल्यानंतर तुमच्या बिझिनेस फेसबुक पेजला तुम्ही जाऊ शकता, तेही जिथे बसला असाल तिथे अगदी फुकटात. या सुविधेचे विकसक टॉम व्ॉडिंग्टन यांनी ही वाय-फाय चाचणी शोधून काढली असून इनसाइट्स विभागात लाइक सोर्सेसमध्ये सोशल वायफाय ही नवीन नोंद दिसल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली आहे. छोटे उद्योग हे इंटरनेट अ‍ॅक्सेस देत असले तरी फेसबुक रूटर देणार आहे. वाय-फाय सेवा वापरणाऱ्या किती जणांनी तुमच्या बिझिनेस पेजला लाइक केले आहे ते लगेच समजू शकणार आहे. ज्यांना ही सेवा वापरायची नाही त्यांच्यासाठी अजूनही उद्योगाने दिलेला पासवर्ड वापराचा मार्ग खुला आहे असे सांगण्यात आले.