शर्मिलाच्या उपोषणाला १२ वर्षे पुर्ण Print

alt

इन्फाळ, ५ नोव्हेंबर २०१२
'आयर्न लेडी आँफ मणिपूर' म्हणून संबोधली जाणारी इराँम चानू शर्मिला हिच्या २००० सालापासून सैन्यबल विशेष अधिकार कायदा(ए.एफ.एस.पी.ए)साठीच्या सुरु असलेल्या उपोषणाला तब्बल बारा वर्ष पुर्ण झाली आहेत. २ नोव्हेंबर २००० मध्ये आसाम मधील मालोम विभागातील इन्फाळ येथे झालेल्या गोळीबारात दहा नागरिकांचा मृत्यू झाला होता, यावर नागरी हक्कावर लढणा-या शर्मिला यांनी उपोषण केले. तसेच नागरी हक्क संबंधीत आंदोलकांनी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मेणबत्त्या पेटवून शर्मिलाला पाठींबा दर्शविला आहे.