दिल्लीत डेंग्यूचे आणखी ३९ रुग्ण Print

पीटीआय, नवी दिल्ली
राजधानीत डेंग्यूचे थमान सुरूच आह़े  डासांच्या प्रादुर्भावामुळे फैलावणाऱ्या डेंग्यूने दिल्लीत सोमवारी आणखीन ३९ जणांना आपल्या कह्यात घेतले आह़े  त्यामुळे आता डेंग्यूग्रस्तांचा येथील एकूण आकडा १ हजार २०० वर पोहोचला आह़े  त्यामुळे दिल्लीत घबराट निर्माण झाली आहे.
सोमवारी आढळलेल्या ३९ पैकी ३७ रुग्ण तिन्ही महापालिका क्षेत्रांतील आहेत़  तर अन्य दोन रुग्ण हे अतिमहत्त्वाच्या भागातील आहेत़  तसेच आतापर्यंत दिल्ली शहरालगतच्या भागांतही ११ डेंग्यूग्रस्त आढळले आहेत़  गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून पसरलेल्या डेंग्यूला आतापर्यंत दोन बालके बळी पडली आहेत़.