आंध्रात दोन अभियंते निलंबित Print

पीटीआय, राजमुंद्री
नीलम वादळाच्या वेळी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याची योग्य पातळी राखण्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सिंचन विभागातील दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. वादळाच्या वेळी जलाशयाचे दरवाजे योग्य पद्धतीने न हाताळल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या नाल्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
आंध्र प्रदेश सिंचन विभागाचे (प्रशासन) मुख्य अभियंता नारायण रेड्डी यांनी साहाय्यक अभियंता ए. सुब्बा राव आणि उपकार्यकारी अभियंता कांथा राव या दोघांना कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. नीलम वादळचा आंध्र प्रदेशला तडाखा बसला तेव्हा सिंचन विभागाच्या या दोघा अभियंत्यांनी जलाशयाचे दरवाजे योग्य पद्धतीने न उघडल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या नाल्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
 या प्रकरणाची गंभीर दखल घेत जलसिंचन विभागाचे मंत्री पी. सुदर्शन रेड्डी यांनी दोषी अभियंत्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.