ओबामांच्या फेरनिवडीचा अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये निषेध Print

पीटीआय, जॅक्सन (अमेरिका)
बराक ओबामा यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने नाराज झालेल्या मिसिसिपी विद्यापीठातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी येथे निदर्शने केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या निषेधाचे वृत्त वेगाने पसरत गेल्याने मध्यरात्रीर्प्यत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत होती. या निषेधकर्त्यांनी वंशवादी घोषणा दिल्याचे विद्यापीठातील प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रकरणी दोघा जणांना अटक झाली.  सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘विद्यापीठ परिसरात दंगल झाल्याची’ अफवा पसरल्याने जमावाच्या संख्येत वाढ झाली.