ग्वाटेमालामधील शक्तिशाली भूकंपात ४८ जण मृत्युमुखी Print

पीटीआय, सेन मार्कोस

ग्वाटेमालामधील दोन प्रांतांमध्ये जाणवलेल्या ७.४ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ४८ जण मृत्युमुखी पडले आहेत. या भूकंपामुळे मेक्सिकोच्या सीमेवरील अनेक भागांतील भूस्खलन झाले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील १०० पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी ह्या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपकेंद्रापासून ६०० मैल दूर असलेल्या मेक्सिको सिटीमध्येही याचे हादरे जाणवले. सेन मार्कोसमध्ये भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान झाले असून येथील ४० जण यामध्ये मृत्युमुखी पडली असल्याची माहिती अध्यक्ष ओट्टो प्रेझ मोलिना यांनी दिली. क्वेटझालटेनिगो राज्यातील ८ जणही या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडले असल्याचे त्यांनी सांगितले.