हिलरींची लवकरच निवृत्ती? Print

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पहिली ‘टर्म’ संपते न संपते तोच हिलरी क्लिंटन आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ओबामा यांची अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ सुरू होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी हिलरी यांनी आपण बहुधा परराष्ट्रमंत्री म्हणून राहू, असे विधान केले होते. त्या वेळी ओबामांच्या नव्या सहकाऱ्यांमध्ये हिलरी यांचा नक्कीच समावेश असेल, असा अर्थ काढला गेला होता. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलॅण्ड यांनी या शक्यतेचा सपशेल इन्कार केला.