..तर महिला आरक्षणास पाठिंबा -मुलायम Print

लखनौ : महिला आरक्षण विधेयकाचे कडवे विरोधक असलेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी शुक्रवारी आपली भूमिका मवाळ करीत या विधेयकास सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. महिला आरक्षण विधेयकाच्या मसुद्यामध्ये दुरुस्ती करून त्यामध्ये दलित, मागासवर्गीय आणि मुस्लीम महिलांचा समावेश केल्यास समाजवादी पक्ष या विधेयकास पाठिंबा देण्याबाबत विचार करील, असे यादव यांनी सांगितले.  यापूर्वी यादव यांनी गुरुवारी बाराबंकीमध्ये बोलताना महिला आरक्षणास विरोध केला होता.