मलालाच्या प्रकृतीत सुधारणा Print

लंडन / नवी दिल्ली : तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेली मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शुक्रवारी दिली. मलालावर सध्या बर्मिगहॅममधील क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीमध्ये सकारात्मक सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.