कांडा, चढ्ढा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
|
|
नवी दिल्ली : माजी हवाईसुंदरी गीतिका शर्मा आत्महत्येप्रकरणी हात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले हरयाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा आणि त्यांची साथीदार अरुणा चढ्ढा यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीतील न्यायालयाने २१ नोव्हेंबपर्यंत वाढ केली आहे.
कांडा आणि चढ्ढा यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबपर्यंत वाढ करण्याचा आदेश देण्यात आला. गीतिका शर्मा हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप कांडा आणि चढ्ढा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. |