‘मोदींवर टीका हे तर काँग्रेसचे नैराश्य’ Print

पीटीआय, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने म्हणजे काँग्रेसचे नैराश्य आहे, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी भाजपतर्फे देण्यात आली. हा केवळ मोदी अथवा मुख्यमंत्रिपदाचा अवमान नसून पूर्ण गुजरातचा अवमान आहे, असे मत भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होत असून त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत.