शाहरुख खानविरुद्ध ‘एफआयआर’ Print

हिंदू देवतेच्या बदनामीचे प्रकरण
पीटीआय, मुझफ्फरपूर

हिंदू देवता राधेचे अवमूल्यन करणारे चित्रीकरण करून धार्मिक भावना दुखाविल्याबद्दल अभिनेता शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि निर्माता करण जोहर यांच्याविरुद्ध स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार येथील सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इजाज अहमद यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘स्टुडण्ड ऑफ दी इयर’ या चित्रपटातील एका गाण्याच्या प्रसंगात राधेचे विकृत चित्रीकरण सादर करण्यात आले आहे, असा आरोप करून अ‍ॅड. सुधीरकुमार ओझा यांनी ५ नोव्हेंबर रोजी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एफआयआर नोंदविण्यात आला.
या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्तीनी अरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. अभिनेता वरुण धवन, अलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि धर्म प्रॉडक्शन यांनाही या खटल्यात आरोपी करण्यात आले आहे.