चीनने तातडीने सुधारणा राबवाव्यात Print

बिजिंग-चीनपुढे सध्या अनेक जोखीम आणि आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक क्षेत्रांमधील सुधारणांबाबत अधिक वेळ दडवणे आता चीनला परवडणारे नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान पदाचे उमेदवार लि केकियांग यांनी शुक्रवारी केले. सध्या चीनमध्ये दशकातील नेतृत्वबदलाची प्रक्रीया सुरु आहे. कम्युनिस्ट पक्षाचे ५७ वर्षीय लि केकियांग सध्या उपपंतप्रधान असून नेतृत्वबदलाच्या प्रक्रीयेत लवकरच ते वेन जिआबो यांच्याकडून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.