जगज्जेतेपद काबीज करण्याचे लक्ष्य -जयवर्धने Print

कोलंबो : भारताविरुद्धच्या मालिकेत आम्ही अपयशी ठरलो. दुखापतींच्या पाश्र्वभूमीवर आम्ही भारताशी चांगली टक्कर देऊ शकलो नव्हतो. परंतु कोणताही विश्वचषक संघासाठी प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळे आता समोर भारत असो किंवा पाकिस्तान आम्ही एकेक आव्हाने पार करीत आहोत. गटसाखळी, सुपर-एट झाल्यानंतर आता उपांत्य फेरी आणि मग विश्वचषक काबीज करणे, हे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे, असे श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. विश्वविजेतेपदाच्या लढतीआधी हे उपांत्य सामन्याचे आव्हान आहे. मोठय़ा स्पध्रेत आमची कामगिरी सातत्यपूर्ण होते आहे, याचा अभिमान वाटतो, असे तो पुढे म्हणाला.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फार चांगली रणनीती आखली. याचा अर्थ असा नाही की, आमच्याविरुद्धही त्यांचे धोरण यशस्वी होईल. संघाची मानसिकता आणि मेहनत ही प्रत्येक सामन्यागणिक दिसून येते आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाशी सामना करायला आम्ही सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया जयवर्धनेने व्यक्त केली.