ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी Print

पी.टी.आय.,  कोलंबो
श्रीलंकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरला तरी पाचपैकी चार सामने जिंकल्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ट्वेन्टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. श्रीलंकेने १२९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून भारत १२० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान (११८ गुण) आणि इंग्लंड (११८ गुण) यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान प्राप्त केले आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेची अव्वल स्थानावरून घसरण झाली असून ते पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा भारताचा युवा फलंदाज विराट कोहली याने नऊ क्रमांकाच्या सुधारणेसह १०वे स्थान पटकावले आहे. कोहलीने पाच सामन्यांत १८५ धावा केल्या. गोलंदाजांमध्ये, हरभजन सिंगची अव्वल २० जणांच्या यादीतून घसरण झाली असून तो सहा क्रमांकाच्या घसरणीसह २३व्या स्थानी पोहोचला आहे. आर. अश्विनने १७ क्रमांकाने झेप घेत २५वे स्थान मिळवले आहे.