‘स्विच कॅप्टन्सी’ आज पुन्हा दिसणार? Print

 

कोलंबो : क्रिकेटमध्ये ‘स्विच हिट’ हा फटका आता चांगलाच लोकप्रिय झाला आहे. पण सोमवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील वेस्ट इंडिविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ‘स्विच कॅप्टन्सी’चा अजब नमुना पेश केला. नियमित संघनायक महेला जयवर्धने, उपकर्णधार अँजेलो मॅथ्यूज संघात असताना कुमार संगकाराकडे या सामन्याचे नेतृत्व देण्यात आले. याबाबत विविध स्तरावर चर्चा झाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही आम्ही कर्णधारपदाबाबतच्या नियमांचा पुन्हा आढावा घेऊ, असे सांगितले. पण गुरुवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व कोण करणार, ही उत्सुकताही अद्याप टिकून आहे. याविषयी जयवर्धने म्हणाला , ‘‘मी आणि संघ व्यवस्थापनाने मिळून नेतृत्वाची धुरा संगकाराकडे सोपविण्याचा निर्णय त्या सामन्यात घेतला होता. क्रिकेटमध्ये आपण फलंदाज बदलतो, गोलंदाज बदलतो तशाच प्रकारे कप्तान बदलण्यात आला. ही एक रणनीती प्रकट करणारी चाल आहे. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये असे निर्णय घयावे लागतात.’’