सानिया-नुरिया यांना उपविजेतेपद Print

चीन :
भारताची सानिया मिर्झा हिला चीन ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सानिया व नुरिया लॅगोस्टेरा यांना रशियाच्या एकतेरिना माकारोवा व एलिना व्हेसनिना यांनी ७-५, ७-५ असे पराभूत केले. हा सामना त्यांनी दीड तासात जिंकला.