पुण्याची ओएनजीसीबरोबर सलामी Print

आयलीग फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी
पुणे
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयोजित केलेल्या चौथ्या आयलीग फुटबॉल स्पर्धेत पुणे फुटबॉल क्लबची (पीएफसी) ८ ऑक्टोबर रोजी ओएनजीसी संघाबरोबर सलामीची लढत होणार आहे. हा सामना शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे.
पीएफसी संघाचा दुसरा सामना मुंबई संघाबरोबर ११ ऑक्टोबर रोजी पुण्यातच होणार आहे.२७ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे ईस्ट बंगालविरुद्ध पीएफसी सामना होईल. ४ नोव्हेंबर रोजी चर्चिल ब्रदर्स, १८ नोव्हेंबर रोजी एअर इंडिया व २४ नोव्हेंबर रोजी युनायटेड सिक्कीम संघाच्या आव्हानास पीएफसी संघास सामोरे जावे लागणार आहे. हे तीनही सामने पुण्यातच होतील. आयलीगच्या पहिल्या सत्रात पीएफसी संघ घरच्या मैदानावर सात व परगावी सहा असे एकूण तेरा सामने खेळणार आहे. दुसऱ्या सत्रात घरच्या मैदानावर सहा व परगावी सात सामन्यांमध्ये पुण्याचा सहभाग राहील.