मुकुंदचे शतक, कसोटी अनिर्णीत Print

पी.टी.आय.
लिंकन, न्यूझीलंड
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील दुसरी अनधिकृत कसोटी अनिर्णीत झाली. भारताचा कर्णधार अभिनव मुकुंदने नाबाद १३२ धावांची खेळी केली. दोन सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णितावस्थेत संपली.
चौथ्या दिवशी २ बाद ११९ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला आधार दिला तो मुकुंदच्या शतकाने. अनुस्तूप मजुमदार आणि मुंबईकर सूर्यकुमार यादव मुकुंदची साथ देऊ शकले नाहीत. मुकुंदने १७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १३२ धावांची खेळी केली.
भारताने ४ बाद २४६ वर आपला डाव घोषित केला. भारताने मनदीप सिंग आणि अशोक मनेरिया यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात ५५४ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र न्यूझीलंडने डीन ब्राऊनलीच्या शतकाच्या जोरावर ४२४ धावांची मजल मारली.