ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात महिलांचा महामुकाबला Print

पी.टी.आय.
कोलंबो
अ‍ॅशेस म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहतो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर रंगणारा संघर्ष. महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने हाच थरार अनुभवता येणार आहे. वेस्ट इंडिजवर आक्रमण गाजवत ऑस्ट्रेलिया, तर न्यूझीलंडला सहज नमवत इंग्लंड संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. रविवारी विश्वचषकाच्या झळाळत्या चषकावर नाव कोरण्यासाठी या पारंपरिक प्रतिस्पध्र्यात महामुकाबला रंगणार आहे.
चालरेट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. चालरेटचा फॉर्म इंग्लंडसाठी जमेची बाजू आहे. सारा टेलरकडूनही इंग्लंडला चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे ज्युलियन हंटर, एलियस पेरी यांना सूर गवसल्याने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी मजबूत झाली आहे. मेग लॅनिंग, जेस कॅमेरून व लिसा स्थळेकरवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची भिस्त आहे.