पेस-स्टेपनेक अंतिम फेरीत Print

जपान खुली टेनिस स्पर्धा

पी.टी.आय.
टोक्यो
लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपनक जोडीने जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. डॅनिइले ब्रासिआली आणि फ्रँटिसेक सरमाक जोडीचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवत पेस-स्टेपनेक जोडीने अंतिम फेरीतले स्थान पक्के केले. यावर्षी लिएण्डरने तीन जेतेपदांची कमाई केली आहे. यापैकी ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आणि मियामी मास्टर्स स्पर्धेत पेसने स्टेपनेकच्या साथीनेच जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने या जोडीला जेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे.