शारापोव्हा अंतिम फेरीत Print

चीन खुली टेनिस स्पर्धा

वृत्तसंस्था
बीजिंग
जबरदस्त फॉर्म कायम राखत मारिया शारापोव्हाने चीन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या चीनच्या लि नाचे आव्हान शारापोव्हाने ६-४, ६-० असे मोडमून काढले. पहिल्या सेटमध्ये शारापोव्हाच्या खराब सव्‍‌र्हिसमुळे लि नाने ३-१ अशी आघाडी घेतली होती. परंतु त्यानंतर शारापोव्हाने लि नाला कोणतीही संधी दिली नाही आणि सलग तीन गुणांची कमाई करत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये लि नाला पूर्णपणे निष्प्रभ करत झटपट सहा गुण पटकावले आणि दुसऱ्या सेटसह दणदणीत विजय मिळवला.