लंगडी : मुंबई, ठाण्याची विजयी सलामी Print

मुंबई : लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगरतर्फे आयोजित १० आणि १४ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत मुंबई, सांगली आणि पुणे संघाने विजयी सलामी दिली. मुलींच्या गटात मुंबई उपनगरने चुरशीच्या सामन्यात नाशिकवर ७-५ असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात मुंबईने सांगलीवर १५-७ असा एक डाव आणि ८ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. प्रीती सुर्वे, गौरी आंबेडकर आणि अस्मिता भुवड यांनी अष्टपैलू खेळ करत विजय साकारला. मुलांमध्ये मुंबईने अहमदनगरचा एक डाव आणि १४ गुणांनी धुव्वा उडवला. अन्य लढतीत ठाण्याने बुलढाण्याचा १४-४ असा एक डाव आणि १० गुणांनी पराभव केला.