जोकोव्हिच, अझारेन्का अजिंक्य Print

वृत्तसंस्था
बीजिंग
नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी चीन खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या जोकोव्हिचने फ्रान्सच्या जो विलफ्रेड त्सोंगाला नमवत जेतेपद पटकावले तर अझारेन्काने मारिया शारापोव्हासारख्या मातब्बर खेळाडूचे आव्हान मोडून काढत जेतेपद नावावर केले. जोकोव्हिचने त्सोंगाचा ७-६ (७-४), ६-२ असे सरळ सेट्समध्ये हरवत चीन खुल्या स्पर्धेत अपराजित राहण्याचा विक्रम कायम केला. जोकोव्हिचचे या स्पर्धेचे हे तिसरे जेतेपद. या विजयासह जोकोव्हिचने त्सोंगाविरुद्धच्या पाचही लढतींमध्ये विजय मिळवण्याची किमया केली आहे.