डी. वाय. पाटील मैदानावर रंगणार रणजी सामना Print

क्रीडा प्रतिनिधी
मुंबई
आयपीएल (इंडियन प्रीमिअर लीग) स्पर्धेच्या अनेक सामन्यांचे आयोजन केलेल्या नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आता रणजी सामना होणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यातील ‘अ’ गटातला शेवटचा साखळी सामना २९ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत रंगणार आहे. या कालावधीत वानखेडे स्टेडियमवर अखिल भारतीय विद्यापीठ अधिवेशन होणार आहे, तर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर नववर्षांच्या स्वागतानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रे-कुर्ला संकुल स्टेडियममध्ये १९ वर्षांखालील गटाचे सामने आयोजित होणार आहेत. यामुळे मुंबई-गुजरात सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार असल्याचे एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी सांगितले.