पेस-स्टेपानेकला उपविजेतेपद Print

जपान खुली टेनिस स्पर्धा

पी.टी.आय.
टोक्यो
लिएण्डर पेस-राडेक स्टेपानेक जोडीला जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर पेया आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस जोडीने पेस-स्टेपानेकचे आव्हान ६-३, ७-६ (५) असे सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले.
पेस-स्टेपानेकला यंदाच्या वर्षांतले दुसरे एटीपी विजेतेपद जिंकण्याची संधी होती, मात्र पेया-सोरेसच्या प्रभावापुढे ते निष्प्रभ ठरले. मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के करत पेस-स्टेपानेक जोडीने वर्षअखेरीस होणाऱ्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये स्थान निश्चित केले. आहे.