ताश्कंद चॅलेंजर टेनिस स्पर्धा : सनम, विष्णू मुख्य फेरीत Print

पी.टी.आय. ताश्कंद
alt

डेव्हिस चषकात भारताला दिमाखदार यश मिळवून देणाऱ्या विष्णू वर्धन आणि सनम सिंग यांनी ताश्कंद चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीच्या सामन्यात विष्णूने जर्मनीच्या मार्टिन इमरिचवर २-६, ६-१, ७-६(५) अशी मात केली. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या लढतीत विष्णूने पहिला सेट गमावला. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सेट्सवर कब्जा करत विजय मिळवला.
२० बिनतोड सव्‍‌र्हिस हे विष्णूच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. मुख्य फेरीसाठी पात्र ठरत विष्णूने पाच एटीपी गुणांची कमाई केली आहे. पहिल्या फेरीत त्याचा मुकाबला रशियाच्या इगोर कुनिस्त्यानशी होणार आहे. दुसऱ्या लढतीत सनम सिंगने जॉर्जियाच्या निकोलझ बेसिलाश्वलीला नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली. अव्वल मानांकित निकोलझचे आव्हान सनमने अवघ्या ५३ मिनिटांत ६-२, ६-० असे मोडून काढले. उंचपुऱ्या निकोलझला टक्कर देण्यासाठी सनमने बॅकहँडच्या फटक्यांचा प्रभावी वापर केला. सनमची पुढची लढत युक्रेनच्या ओलेकसँडर नेडोव्हसोव्हशी होणार आहे.