आयसीसी ट्वेन्टी-२० संघात एकमेव भारतीय खेळाडू Print

पुरुष संघात विराट कोहली तर महिला संघात पूनम राऊतचा समावेश
पी.टी.आय. कोलंबो
alt

भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) जागतिक ट्वेन्टी-२० संघात स्थान पटकावले आहे. कोहलीने विश्वचषकात सातत्यपूर्ण प्रदर्शनासह पाच सामन्यांत मिळून १८५ धावा केल्या.
महेला जयवर्धनेकडे या संघाचा कर्णधार आहे. सुरेश रैनाची बारावा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. महिला संघात पूनम राऊत ही भारताची एकमेव प्रतिनिधी आहे. सामनावीर पुरस्काराची मानकरी चालरेट एडवर्ड्स या संघाची कर्णधार आहे.
आयसीसी पुरुष संघ : ख्रिस गेल (वेस्ट इंडिज), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), विराट कोहली (भारत), महेला जयवर्धने-कर्णधार (श्रीलंका), ल्यूक राइट (इंग्लंड), ब्रेंडन मॅक्युल्लम-यष्टीरक्षक (न्यूझीलंड), मार्लन सॅम्युअल्स (वेस्ट इंडिज), लसिथ मलिंगा (श्रीलंका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), सईद अजमल (पाकिस्तान), अजंथा मेंडिस (श्रीलंका). बारावा खेळाडू- सुरेश रैना (भारत)
आयसीसी महिला संघ : चालरेट एडवर्ड्स-कर्णधार (इंग्लंड), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), पूनम राऊत (भारत), लॉरा मार्श (इंग्लंड), सारा टेलर-यष्टीरक्षक (इंग्लंड), लिसा स्थळेकर (ऑस्ट्रेलिया), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज), ज्युलिया हंटर (ऑस्ट्रेलिया), इलियसे पेरी (ऑस्ट्रेलिया), कॅथरिन ब्रँट (इंग्लंड), इरिन बर्मिगहॅम (न्यूझीलंड). बारावा खेळाडू-जेसकॅमेरुन (ऑस्ट्रेलिया)