सिडनी सिक्सर्सला जेतेपद Print

चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा
पी.टी.आय., जाहोन्सबर्ग

मायकेल लम्बने आठ चौकार आणि पाच चौकारांसह ४२ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ८२ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर सिडनी सिक्सर्सने लायन्स संघावर १० विकेट आणि ४५ चेंडू राखून आरामात विजय मिळवित चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावले. लम्बने ब्रॅड हॅडिन(नाबाद ३७) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचत हा विजय साकारला.

त्याआधी लायन्सचा संघ २० षटकांत १२१ धावांत गारद झाला. जीन सिम्सने सर्वाधिक ५१ धावा केल्या. सिडनीकडून नॅथन मॅक्क्युलमने २४ धावांत ३ तर जोश हॅझलवूड २२ धावांत ३ बळी घेतले. मायकेल लम्बलाच सामनावीर पुरस्काराचा मान मिळाला, तर मिचेल स्टार्कला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.