इंग्लडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सोमवारी निवड Print

पी.टी.आय., नवी दिल्ली
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड ५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये करण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सोमवारी कळविण्यात आले. ५ नोव्हेंबरला संपूर्ण निवड समिती मुंबईच्या क्रिकेट कार्यालयात भेटणार आहेत. या वेळी होणाऱ्या बैठकीमध्ये इंग्लंडविरुद्ध १५ ते १९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ निवडण्यात येईल, असे बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले.