आयपीएलसह क्रिकेटला गांगुलीचा रामराम Print

पी.टी.आय., कोलकाता

शाहरुख खानची कोलकाता नाइट रायडर्स आणि त्यानंतर सहाराच्या पुणे वॉरिअर्ससाठी मुशाफिरी केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आयपीएलला (इंडियन प्रीमिअर लीग) रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा मार्ग पत्करला आहे. चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला दादा बंगालसाठी आणि आयपीएलमध्ये खेळत होता.
आयपीएलचा सहावा हंगाम संपेल तेव्हा मी ४१ वर्षांचा होईन. ट्वेन्टी-२० हे अतिशय आव्हानात्मक प्रकार आहे. चाळिशी ओलांडल्यानंतर खेळणे कठीण झाले असते असे गांगुलीने सांगितले. पुणे वॉरिअर्स संघ व्यवस्थापनाला या निर्णयाबाबत गांगुलीने गेल्या वर्षीच संकेत दिले होते.