मायदेशात खेळपट्टय़ांचा फायदा घेण्यात गैर काहीच नाही - अमरे Print

प्रसाद लाड, मुंबई

आपण जेव्हा इंग्लंडला जातो तेव्हा आपल्याला योग्य अशा खेळपटय़ा दिल्या जात नाहीत. ही उपक्रम प्रत्येक देश राबवत असतो आणि आपल्या देशातील खेळपटय़ांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी तर इंग्लंडचा एक बलाढय़ संघ समोर आहे आणि त्यांना पराभूत करायचे आहे, त्यामुळे आपल्या देशातील खेळपटय़ांचा फायदा घेण्यात काहीही गैर नाही. मी १९९२-९३ संघाचा सदस्य होतो, तेव्हा आपण त्यांना त्यांच्या देशात ३-० असं पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडवर जेवढा दबाव आणि खेळपटय़ांचा फायदा घेता येईल, ते महत्वाचं आहे. कारण आपल्या २-३ कसोटी मालिका फार वाईट गेल्या आहेत, त्यामुळे या ही मालिका चांगली होणं, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला फायदा हेईल, तशी खेळपट्टी बनवण्यात यावी आणि यात काहीच गैर नाही, असे मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी सांगितले.
भारतीय ‘अ’ संघाच्या सरावादरम्नाय कर्णधार सुरेश रैनाला अमरे सर मार्गदर्शन करताना दिसले, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, रैनाला मी १९ - वर्षांखालील क्रिकेटपासून पाहतो आहे, त्याच्या खेळातले चढ-उतार, कधी कधी त्यांच्या कारकीर्दीत कठिण वेळ येतो, तेव्ह त्यांना मानसीक आधाराची गरज असते, त्याचबरोबर आपण कुठे चुकतोय आणि त्यावर योग्य सल्ला काय असू शकतो, हे त्यांना जाणून घ्यायचे असते. त्याच्याकडून चुकीचे काय होत असेल तर त्याला मी कळवतो. त्याचबरोबर रॉबिन उथप्पालाही मी खासजी प्रशिक्षण देतो. या खेळाडूंबरोबर हा बऱ्याच वर्षांचा संबंध आहे, त्याचबरोबर या खेळाडूंना एक विश्वास असतो की, आमल्याला कोणी तरी मार्गदर्शन करत आहे, कोणाचे तरी आपल्यावर लक्ष आहे. आंतररांष्ट्रीय स्तरावर बरेच प्रशिक्षक त्यांना भेटतात, पण एवढय़ा वर्षांपासून त्यांना ओळखत असल्याने त्यांच्या खेळातले बारकावे मला कळतात आणि खासकरून त्यांच्या कठिण कालखंडात त्यांना सावरण्याची जबाबदारी माझ्यावर असते.
एका संघाला प्रशिक्षण देणं आणि खेळाडूला खाजगी प्रशिक्षण देणं, यामध्ये किती तफावत आहे, असे विचारल्यावर अमरे म्हणाले की, या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. संघाला प्रशिक्षण करताना तुमच्याकडे बरेच पर्याय असतात. एक खेळाडू चांगला खेळला नाही तर दुसरा खेळाडू तुमच्याकडे असतो. यावेळी डोक्यात एकचं उद्देश असतो आणि तो म्हणजे संघ जिंकणं. त्यामुळे जास्त लक्ष सांघिक खेळावर असतं. तिथे संपूर्ण फलंदाजीवर काम केलं जातं, त्यामध्ये सलामीवीर, मधली फळी, तळाची फळी, असे विभाग असतात. पण वैयक्तिक प्रशिक्षणामध्ये त्याच्याकडून चांगली कामगिरी कशी होईल, हेच ध्येय असतं. त्यावेळी त्या खेळाडूचं अपयश हे आपलं अपयश असतं. त्यामुळे तांत्रिक, शारीरिक, मानसीक सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेबद्दल अमरे म्हणाले की, दोन्ही संघांना पाचही दिवस चांगला खेळ करावा लागेल. कारण ही मालिका खडतर दोन्ही संघांसाठी असेल. इंग्लंडचा संघ चांगलं क्रिकेट खेळून आला आहे, त्यांचा संघ चांगलाच समतोल आहे. आपल्या संघात अनुभवी खेळाडू आहेत. माझ्यामते दोन्ही संघांची गोलंदाजी कशी होते, हे महत्वाचे ठरेल.